About Us

Our Heritage, Mission & Vision

।। श्री परशुराम आरती ।।

भगवान परशुराम की पावन आरती

ॐ जय परशुधारी, स्वामी जय परशुधारी।

सुर नर मुनिजन सेवत, श्रीपति अवतारी ।।

ॐ जय परशुधारी...।।

जमदग्नी सुत नर-सिंह, मां रेणुका जाया।

मार्तण्ड भृगु वंशज, त्रिभुवन यश छाया।।

ॐ जय परशुधारी...।।

कांधे सूत्र जनेऊ, गल रुद्राक्ष माला।

चरण खडाऊ शोभे, तिलक त्रिपुण्ड भाला ।।

ॐ जय परशुधारी...।।

ताम्र श्याम घन केशा, शीश जटा बांधी।

सुजन हेतु ऋतु मधुमय, दुष्ट दलन आंधी ।।

ॐ जय परशुधारी...।।

मुख रवि तेज विराजत, रक्त वर्ण नैना।

दीन-हीन गो विप्रन, रक्षक दिन रैना ।।

ॐ जय परशुधारी...।।

कर शोभित बर परशु, निगमागम ज्ञाता।

कंध चाप-शर वैष्णव, ब्राह्मण कुल त्राता ।।

ॐ जय परशुधारी...।।

माता पिता तुम स्वामी, मीत सखा मेरे।

मेरी बिरद संभारो, द्वार पडा मैं तेरे।।

ॐ जय परशुधारी...।।

प्रस्तावना

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (नागपूर शाखा)

जगातील ब्राह्मणांचे श्रद्धास्थान भगवान श्री परशुराम यांच्याबद्दल असे म्हणतात कि ते शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये निपुण होते. अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्म इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।। अर्थात ब्राह्म तेज आणि क्षात्र तेज यांनी युक्त असे सामर्थ्यवान परशुराम हे ब्राह्मण समाजाचे आदर्श नेतृत्व आहे असे आपण सर्वजण मानतो.

अन्याय आणि अत्याचार याविरुद्ध भगवान परशुरामांनी तब्बल 21 वेळा समाजाला संघटीत करून मदांध सत्ताधाऱ्यांचा विनाश केला आणि स्वतः जिंकलेली पृथ्वी महर्षी कश्यपांना दान करून स्वतःसाठी प्रत्यक्ष सागराला मागे हटवून अपरान्तक म्हणजे कोकण पट्टीची निर्मिती केली अशा सामर्थ्यशाली, पराक्रमी, विद्वान, संवेदनशील परशुरामांना आपण आदर्श मानले आहे.

आपल्या सनातन संस्कृतीत ब्राह्मणांचे स्थान फार उच्च दर्जाचे मानले गेले आहे. स्वतः अकिंचन अवस्थेत राहून ज्ञानोपार्जन आणि ज्ञानदान यामध्ये व्यस्त राहणाऱ्या ब्राह्मण समाजाने कठीण काळात राजाला योग्य मार्गदर्शन करीत राष्ट्राचे कल्याण साधले आहे.

पूर्वी जेव्हा चक्रवर्ती सम्राट अदंड्योस्मि असे म्हणत असे तेव्हा त्याला ब्रह्मवृन्दाकडून धर्मदंड्योसि अशी जाणीव करून दिली जात असे. किंबहुना ब्राह्मणांच्या तपःसाधना आणि आत्मतेजाने या आपल्या राष्ट्राची निर्मिती झाली आहे. राष्ट्र जागरणाचे एक महत्वाचे कार्य ब्राह्मणांनी नेहमीच पार पाडले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतंत्रता संग्रामाचे प्रेरक नेतृत्व ब्राह्मणांनी केले हे जसे खरे आहे तसेच समाजसुधारणांचा आग्रह धरणारे आणि कालबाह्य रुढींचा त्याग करून प्रगतीच्या नवनवीन वाटा धुंडाळण्याची प्रेरणा जागविणारे ब्राह्मणच होते हे देखील एक ऐतिहासिक सत्य आहे.

संघे शक्ती कलौयुगे - सध्याचे युग हे संघशक्तीचे आहे. तेव्हा आज विखुरलेल्या ब्राह्मण समाजाचे देखील एक संघटन असावे असा विचार करून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापना करण्यात आली.

समग्र ब्राह्मण समाजाचा आर्थिक, सामाजिक, आणि अध्यात्मिक विकास साधत, ब्राह्मण समाजाच्या अस्तित्वाचे आणि अस्मितेचे जतन करणे हा या संघटनेचा प्रमुख हेतू आहे. तसेच ब्राह्मण समाजाबद्दल पसरविण्यात आलेले गैरसमज, आरोप आणि आघात यांचे परिमार्जन करीत स्वाभिमान, स्वावलंबी, संस्कारयुक्त शिक्षणाने युक्त, निरोगी, असा ब्राह्मण समाज निर्माण करून राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीला हातभार लावणारा आणि त्यासाठी राष्ट्रभक्तीची भावना जागवित संपूर्ण समाजाला नेतृत्व प्रदान करणारा ब्राह्मण समाज तयार करणे हे देखील महासंघाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.

कोरोना काळातील सेवा

200 हून अधिक ब्रह्मवृंदांनी केलेल्या अक्षय पात्रातून 380 कुटुंबांना मदतीचा हात दिला. रुग्णालयातील बेड्स, औषधी, रुग्णवाहिका, प्राणवायू यांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून दिली.

विविध आघाड्या

वैद्यकीय आघाडी, विधी आघाडी, महिला आघाडी, बालगोपाल आघाडी, पौरोहित्य आघाडी, व्यावसायिक आघाडी यांच्या माध्यमातून समाजसेवा.

आपला संकल्प

सर्वेपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयः ।।

सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चिद दुःखमाप्नुयात ।।

ही उक्ती सार्थक करण्याचा संकल्प करू या

Become a Part of Our Community

Join thousands of members who are preserving our heritage and building a stronger future together.